जय जय जगदंबे, Jay Jay Jagdambe Aarti | Renuka Mata (रेणुका माता)

जय जय जगदंबे |Renuka Mata (रेणुका माता) | Video

जय जय जगदंबे | Aarti (आरती) | Renuka Mata (रेणुका माता)

अनुपम स्वरुपाची तुझी धाटी ! अन्य नसे या सृष्टी !
तुज सम रूप दुसरे, परमेष्टी ! करिता झाला कष्टी !
शशीरस रसरसला ,वदनपुटी ! दिव्य सुलोचन दृष्टी !
सुवर्ण रत्नांच्या, शिरी मुकुटी ! लोपती रविशशी कोटी !
गजमुखी तुज स्तविले हेरंबे ! मंगल सकळारंभे
 !! जय जय !! १ !!

कुमकुम चिरी शोभे मळवटी ! कस्तुरी टिळक लल्लाटी !
नासिक अति सरळ, हनुवटी ! रुचिरामृत रस ओठी !
समान जणू लवल्या, धनुकोटी ! आकर्ण लोचन भ्रुकुटी !
शिरी नीट भांगवळी, उफराटी ! कर्नाटकची घाटी !
भुजंग नीळरंगा, परी शोभे ! वेणी पाठीवर लोंबे 
!! जय जय !! २ !!

कंकणे कनकाची मनगटी ! दिव्य मुद्या दश बोटी !
बाजूबंद जडे बाहुबटी ! चर्चुनी केशर उटी ! सुगंधी पुष्पांचे हार कंठी !
बहु मोत्यांची दाटी ! अंगी नवी चोळी, जरीकाठी ! पीत पितांबर तगटी !
पैंजण पदकमळी, अति शोभे ! भ्रमर धावती लोभे 
!! जय जय !!३ !!

साक्षप तू क्षितिच्या तळवटी ! तूचि स्वये जगजेठी !
ओवाळीत आरती, दिपताटी ! घेऊनी कर संपुष्टी !
करुणामृत हृदये, संकटी ! धावसी भक्तांसाठी ! 
विष्णूदास सदा, बहुकष्टी ! देशील जरी नीजभेटी !
तरी मग काय उणे, या लाभे ! धाव पाव अविलंबे 
!! जय जय !! ४ !!
🎧 Song Credits:
Song : Jay Jay Jagdambe Aarti | Renuka Mata Lyrics
Music, Voice, Editing: Sukhada Bhave-Dabke
Lyrics: Traditional
Langauge: Marathi
Costumes, Cinematography: Shamika Bhave

#renukadevi #renukamata #aarti #navratri #durgadevi #durgapooja #renukaaarti #mahurgad #jayjayjagdambe #durga #renuka #navratriaarti

शारदीय नवरात्रोत्सव : रेणुकामातेची आरती | Renuka Mata Aarti

जय देवी श्री देवी, रेणुका माते!
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती!
वज्रचुडेमंडित तव, गिरिशिखरे वसती॥१॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते!
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
भाग्यवती तूं जननी, परशुरामाची!
तेहतीस कोटी देवांवरि, तव सत्ता साची॥२॥

जय देवी श्री देवी, रेणुका माते!
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
सीता, लक्षी, पार्वती, यल्लम्मा सारी!
...
Previous Post Next Post